मी नग्न होणार नाही! नर्गिस फाकरी म्हणते मी अजिबात तडजोड करणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉकस्टार आणि मद्रास कॅफेतील भूमिकांमुळे अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने चांगली प्रसिद्धी मिळवली होती. मात्र त्यानंतर फारसे चांगले चित्रपट न मिळाल्याने तिचं अभिनयातील स्थान पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. नर्गिस ओटीटीवर पदार्पण करत आपलं करीअर पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. टटलूबाज नावाच्या सिरीजमध्ये ती झळकणार आहे. करीअर पुन्हा मार्गावर आणण्यासाठी झगडणाऱ्या नर्गिसने काहीही झालं तरी मी नग्न दृश्ये देणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

एका मुलाखतीमध्ये नर्गिसला प्रश्न विचारण्यात आला होता की एखाद्या चित्रपट किंवा सिरीजची गरज असेल तर तू नग्न दृश्य देशील का ? यावर तिने म्हटले की मला न्यूडिटी म्हणजेच नग्नपणाची समस्या असून मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न दृश्ये देणार नाही. टटलूबाज सिरीजमध्ये नर्गिस ही होमोसेक्शुअल म्हणजेच लेस्बिअन दाखवण्यात आली आहे. याबाबत विचारलं असता तिने म्हटले की त्या सिरीजची गरज असल्याने मी ही भूमिका साकारली आहे. पडद्यावर एखादी महिला दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून राहात असल्याचं दाखवण्यात आलं असेल तर ती त्या प्रोजेक्टची गरज असते आणि भूमिका साकारण ही त्या कामाची गरज असते,त्यामुळे अशी भूमिका साकारणं चुकीचे नाही.