
उल्कापिंड पृथ्वीला धडकल्यास मोठा विनाश होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हे उल्कापिंड पृथ्वीला धडकेल की नाही, याचे उत्तर मिळविण्यात अमेरिकेच्या नासाला मोठे यश आले आहे. नासाचे कॅप्सुल तब्बल 643 कोटी किलोमीटर अंतर पार करून पृथ्वीवर आले असून उल्कापिंडावरील माती त्याने आणली आहे. उल्कापिंड किती मजबूत आहे के कळण्यासाठी यान पाठवण्यात आले होते. मातीचे नमुने घेऊन कॅप्सुल पृथ्वीवर आले आहे.
24 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता एक कॅप्सुल अमेरिकेच्या उटाहमधील ग्रेट सॉल्ट लेक वाळवंटात उतरले. या कॅप्सुलने उल्कापिंडावरील माती आणली असून हे उल्कापिंड आजपासून 159 वर्षांनी पृथ्वीवर पडणार असल्याचे सांगितले जाते. याला शास्त्रज्ञांनी बेनू असे नाव दिले आहे. नासाने त्यासाठी OSIRIS-ReX मोहिम आखली होती.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान 14 दिवसांनी जागे होणार
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागे होण्यासाठी आणखी 14 दिवसांचा कालावधी लागणार आहे. इस्रो 6 ऑक्टोबर रोजी दोघांशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर हा इस्रोसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असेल, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. चंद्रावर संपूर्ण एक रात्र उणे 200 आणि उणे 250 डिग्री सेल्सियस इतक्या कमी तापमानात निष्क्रियच राहील. इतक्या कमी तापमानात उपकरणांना ऊर्जा कशी मिळणार याकडेही सोमनाथ यांनी लक्ष वेधले.
टक्कर झाल्यास किती विनाश?
सात वर्षांपूर्वी हे यान अवकाळात पाठविण्यात आले. उल्कापिंडापेक्षा बेनू 20 पटीने छोटा आहे. परंतु, उल्कापिंडाची पृथ्वीशी टक्कर झाल्यास मोठी हानी होईल, असे सांगितले जाते. टक्कर झाल्यास 10 किलोमीटर व्यासाचा खड्डा पडू शकतो. त्यामुळे तब्बल 1 हजार किलोमीटरपर्यंत मोठे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे.
उल्कापिंड अवकाशातच उडवणार
उल्कापिंड अवकाशातच अण्वस्त्राने उडवण्याची नासाची योजना आहे. त्यासाठीच नासाने विशेष मोहीम आखली होती. कॅप्सुल छोटय़ा फ्रीजच्या आकाराचे असून अशाप्रकारची ही पहिलीच मोहीम होती 45 किलोच्या कॅप्सुलमध्ये 250 ग्रॅम मातीचा नमुना आहे.



























































