मंगळावर पसरली बर्फाची चादर, ‘नासा’ने जारी केली छायाचित्रे

मंगळावर पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक असलेला मानव त्या ग्रहाबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यावर प्राणवायू आहे का? पाणी आहे का? जीवसृष्टी होती का? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. अखंडपणे सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नात मंगळाबद्दल नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळाची ताजी छायाचित्रे घेतली. त्यात मंगळावर बर्फाची चादर पसरल्यासारखे दिसत आहे.

मंगळ हा जगभरातील शास्त्र्ाज्ञांचा कुतुहलाचा विषय आहे. ‘नासा’ने मंगळाची छायाचित्रे सोशल मीडियावरील आपल्या हॅन्डलवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे ‘नासा’च्या मंगळ टोही ऑर्बिटरने घेतली आहेत. त्यात मंगळाच्या पृष्ठभागावर बर्फाची चादर पसरल्यासारखे दिसत आहे. तो बर्फ आहे की इतर काही या दिशेने आता संशोधन सुरू आहे. तो बर्फ असेल तर तिथे पाणीही असेल आणि जिथे पाणी असते तिथे जीवसृष्टी निश्चितच होती किंवा आहे असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. परंतु तो बर्फ नसून मातीचे थर असावेत असाही शास्त्र्ाज्ञांचा अनुमान आहे.

‘नासा’ने शेअर केलेल्या मंगळाच्या या छायाचित्रांना लाखो नेटकऱयांनी लाईक्स दिल्या आहेत. अनेकांनी त्यावर आपल्या कमेंटही नोंदवल्या आहेत. मंगळावर बर्फ आढळल्याचे शास्त्राज्ञांचे हे काही पहिलेच मत नाही. यापूर्वी 2018 मध्ये इटलीतील शास्त्रज्ञ रॉबर्टो ओरोसेई यांनीही मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर खोलवर बर्फ असल्याचे सिग्नल रडारद्वारे मिळाल्याचे जाहीर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या