नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 36 हजार जणांची कोरोनावर मात; अॅक्टिव्ह रुग्ण 7 हजार 734

893

नाशिक जिल्ह्यात गेल्या सवापाच महिन्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 839 वर पोहोचली. त्यापैकी उपचारानंतर 36 हजार 152 जण ठणठणीत बरे होवून घरी परतले. हे प्रमाण 80.63 टक्के आहे. सोमवारी एका दिवसात 1 हजार 86 जणांनी कोरोनावर मात केली, तर नवे 1 हजार 149 बाधित आढळले. सध्या उपचार घेत असलेले अॅक्टिव्ह रुग्ण 7 हजार 734 इतके आहेत.

नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस नव्या बाधितांची संख्या अकराशेहून अधिक होती. तसेच नाशिक शहरातही सहाशे ते नऊशे दरम्यान सात दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता वाढलेली आहे. शहरात सोमवारी दिवसभरात नवे ७३४, ग्रामीणमध्ये ३४३, मालेगावला ७२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १४९ इतके रुग्ण वाढले. सोमवारी नाशिकमध्ये १२, ग्रामीण भागात ७ आणि मालेगावला एकाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत ९५३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण नाशिक शहरात 4 हजार 211 इतके आहेत. नाशिक ग्रामीण- 2 हजार 861, मालेगाव- 647 अशी आकडेवारी आहे. ग्रामीण भागातही निफाड तालुक्याला कोरोनाने जास्त ग्रासले असून, येथे 577 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. नाशिक तालुका- 402, सिन्नर- 391, नांदगाव- 326, मालेगाव तालुका- 304, सटाणा- 289, चांदवड- 112, येवला- 106, इगतपुरी- 99, दिंडोरी- 84, देवळा- 78, त्र्यंबकेश्वर- 53, कळवण- 27, पेठ- 10, सुरगाणा- 3 अशी तालुकानिहाय अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.

एका दिवसात 1086 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 1 हजार 86 जणांना डिस्चार्ज मिळाला. गेल्या आठ दिवसातील हा उच्चांक आहे. एकट्या नाशिक शहरात 878 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले. शहरात आजपर्यंत 26 हजार 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील हे बरे होण्याचे प्रमाण 84.58 टक्के इतके आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.

आपली प्रतिक्रिया द्या