नाशिकच्या शेतकऱयाचे स्पृहा जोशीने केले कौतुक, लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांना पुरवला ताजा भाजीपाला

कोरोना काळातदेखील नाशिकचे कृषितज्ञ, शेतकरी अमोल गोऱहे यांनी मुंबईकरांना ताजा भाजीपाला अखंड पुरकला. यामुळे लोकांच्या ताटात ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या दर्जेदार भाज्या तर आल्याच, पण त्यासोबतच अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला. या कार्याबद्दल अभिनेत्री स्पृहा जोशी हिने ब्लॉगच्या माध्यमातून गोऱहे यांचे कौतुक केले आहे.

स्पृहाने ब्लॉगमध्ये लिहिलंय, भाजीपाला घेताना आपण ती हिरवीगार आहे एवढंच बघतो. दर्जाचा विचार मात्र क्कचितच करतो. भाज्यांच्या, फळांच्या करकरच्या रंगाला भुलून न जाता त्या आतून किती आरोग्यदायी आहेत, आपल्या आरोग्याला किती फायदेशीर आहेत याचा आपण विचार करायला हवा. असा खात्रीशीर, आरोग्यासाठी पोषक भाजीपाला मिळण्यासाठी तिने अमोल गोऱहे यांच्या कार्याचा दाखला दिलाय. गोऱहे यांच्या ग्रीनफिल्ड एग्रो सर्किसेसमार्फत थेट शेतातून आपल्या घरात ताजा भाजीपाला, फळे पोचकण्याची सेवा देण्यात येत आहे. ऑरगॅनिक पद्धतीने पिकवला जाणारा हा भाजीपाला योग्य दरात अॅपवर उपलब्ध असून ग्रीनफिल्डची सेवा घेण्याचे आवाहन तिने केले आहे.

अनेकांना मिळाला रोजगार

अमोल गोऱहेंनी कोरोना काळात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात आपल्या ग्रीनफिल्ड ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून ताजा, स्कच्छ भाजीपाला, फळे, धान्य, बचतगटांच्या महिलांनी बनवलेले पापड, लोणचे स्कस्त दरात घरपोच पोहचवण्याचे काम केले. या काळात जेव्हा ठाण्यामध्ये घरोघरी वृत्तपत्र सेवा देणाऱया मुलांच्या नोकऱया गेल्या तेक्हा त्यातील अनेकांना गोऱहे यांनी आपल्या उपक्रमात सहभागी करून रोजगार मिळवून दिला. त्यांच्या या कामाची दखल घेत अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कारही झाला.

आपली प्रतिक्रिया द्या