साडेपाच महिन्यांनंतर पंचवटी एक्सप्रेस पुन्हा रुळावर

948

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून गेल्या साडेपाच महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस आरक्षणधारकांना घेवून शनिवारी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी मनमाड येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यामुळे दररोज नोकरी व व्यवसायामुळे मुंबईला जाणाया जिल्हावासियांनी आनंद व्यक्त केला. पहिल्या दिवशी 328 आरक्षणधारकांनी या विशेष गाडीतून प्रवास केला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत रेल्वे सेवा बंद होती. श्रमिक स्पेशल,तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठीच रेल्वेच्या विशेष फेऱया सुरू होत्या. पंचवटी एक्सप्रेस बंद असल्याने दररोज मुंबईत ये-जा करणाया जिह्यातील नोकरदार व व्यावसायिकांची गैरसोय होत होती. ही एक्सप्रेस पूर्ववत सुरू होण्याची मागणी करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने केवळ आरक्षणधारकांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज तब्बल 174 दिवसांनंतर पहिल्यांदाच पंचवटी एक्सप्रेस मनमाडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. 1534 आसन क्षमता असणाऱया या गाडीतील सर्वसाधारण बोगीतून आज 320,तर वातानुकुलित बोगीतून आठ प्रवाशांनी प्रवास केला.

आपली प्रतिक्रिया द्या