बालगणेश फाऊंडेशनतर्फे ऑक्सिजन बँक सुरू

नाशिक शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला असून कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनची मोठी गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पुढाकार घेत बालगणेश फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन बँक सुरू केली, याद्वारे गरजू रूग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुरवण्यात येणार आहेत. यासाठी 9021986967 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी हे कॉन्सेंट्रेटर बुक करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या