
‘संस्कृती परंपरा वीरांची, नाशिकच्या इतिहासाची’ हे ब्रीद जपत नाशिकमध्ये ‘वीर पूजन सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध देवी देवता आणि ऐतिहासिक वीरांच्या रुपामधील बालवीरांचा गौरव यावेळी करण्यात आला.
या सोहळ्यात कुमारी मधुरा गणेश ठोंबरे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या अद्भूत रूपाचे आणि उत्साहाचे कौतुक खुद्द माननीय आयुक्त खत्री मॅडम यांनी केले. आयुक्तांनी मधुराचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आणि तिच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाशिकच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक बालकांनी ऐतिहासिक वेशभूषा करून महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की, “लहान मुलांमध्ये आपल्या गौरवशाली इतिहासाचे संस्कार रुजवणे काळाची गरज आहे. मधुरासारख्या बालकलाकारांमुळे आपली संस्कृती सुरक्षित आणि प्रवाही असल्याचे समाधान वाटते.”
नाशिक संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने या भव्य सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. गोदावरी नदीचा तीर नेहमीप्रमाणे वीरांच्या मिरवणुकीने ओसांडून गेला होता. तर छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.






























































