Video – नाशिक 12 ते 22 मे कडक लॉकडाउन, पाहा काय सुरू काय बंद?

नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंणात आणण्यासाठी Break the chain अंतर्गत येत्या बुधवार म्हणजेच 12 मे पासून 22 मे पर्यंत कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात काय सुरू राहणार , काय बंद राहणार यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. तसेच नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी Video वरून नाशिकरांना याची माहिती दिली आहे.

 

 

कडक लॉकडाउनमध्ये हे सुरू राहणार

1 वैद्यकीय सेवा, मेडिकल, खासगी दवाखाने

2 पशूवैद्यकीय सेवा

3 किराणा मालाची दुकाने, बेकरी, मिठाई, पाळीव प्राण्यांची दुकाने सकाळी 7 ते 12 या कालावधीत सुरू राहतील. मात्र ते केवळ घरपोच वस्तू पुरवतील, ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करू शकणार नाही.

4 दूध संकलन आणि घरपोच विक्रीसाठी सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत सुरू राहतील.

5 हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्री केंद्र घरपोच पार्सल सेवा सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 यावेळात सुरू राहील.

6 शिवभोजन थाळी केंद्र पार्सल सेवा सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहतील.

7 शासकीय रास्तभाव दुकानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार सुरू राहतील.

8 भाजी विक्री रस्त्याच्या कडेला आखून दिलेल्या भागातून सकाळी 7 ते 12 यावेळात सुरू राहतील. फिरत्या हातगाड्या देखील याच वेळात फिरू शकतील.

9 ऑनलाइन शिक्षण

10 लसीकरण केंद्रे क्षमतेनुसार सुरू राहतील, किती लोकांसाठी लस उपलब्ध आहे याची माहिती केंद्राबाहेर लावणे बंधनकारक

11 लग्ना करिता केवळ पाच जणांची परवानगी, लग्न रजिस्टर पद्धतीनेच करण्याचे निर्देश

12 अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 आणि त्यानंतरच्या विधीसाठी जास्तीत जास्त 15 लोकांचीच परवानगी देण्यात आली आहे.

13 आंतर जिल्हा प्रवासासाठी ईपास आवश्यक

हे बंद राहणार

1 सावर्जनिक खासगी, बगीचे, मोकळ्या जागा

2 शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था

3 सर्व प्रकारचे समारंभ हॉल, मंगल कार्यालये, लॉन, तत्सम ठिकाणे.

4 भाजी मार्केट आणि आठवडी बाजार

आपली प्रतिक्रिया द्या