दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभूमीवर नाथसागरची सुरक्षा वाढवली

487

श्रीलंका मार्गे पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडूत घुसल्याच्या पार्श्वभूमिवर गुप्तचर विभागाने सुरक्षा यंत्रणांना सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून जायकवाडी येथील नाथसागर धरणाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नाशिक व नगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या पाण्याने जायकवाडीचे नाथसागर हे धरण 90 टक्के भरले असून गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यांद्वारे तसेच दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमिवर जायकवाडीतील जलसाठा पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करीत होते. लोकांची वर्दळ वाढल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झालेली असल्याचे पोलीस प्रशासनाचे मत होते. त्यामुळे एटीएसनेही जलसंपदा विभागाला सुरक्षेबाबत पत्र दिलेले होते.

दरम्यान हायअलर्ट जारी करण्यात आला. तत्पूर्वी धरणावर चार पोलीस कर्मचारी नियमित नेमण्यात आले होते. त्याऐवजी आता 12 सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर जलसंपदा विभागातर्फे खासगी सुरक्षा गार्ड वाढवण्यात आले आहेत. बाजूच्या चौक्यां 24 तासांचा खडा पहार्‍याचे आदेशही देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर खासगी व्यक्तींना धरणार जाण्यास बंदी करण्यात आली आहे. शासकीय कर्मचार्‍यांनासुद्धा गेटर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या