
ट्रायने मोबाइल युजर्सला स्पॅम कॉलपासून सुटका व्हावी यासाठी कडक नियम बनवले आहेत. परंतु, देशात अद्याप 87 कोटी मोबाइल ग्राहकांना स्पॅम कॉलचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मोबाइलधारकांना टेलिमार्केटरहून कॉल येत आहेत, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ट्रायने स्पॅम कॉलपासून सुटका करण्यासाटी डीएनडी 3.0 अॅप जारी केला आहे. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध असून यावरून स्पॅम कॉलला ब्लॉक करता येऊ शकते.