
दिल्लीहून विजयवाडा चाललेल्या एअर इंडियाच्या विमानाचे सोमवारी जयपूरला ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे विजयवाडाला जाणारे विमान जयपूरला वळवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान AI 2517 दिल्ली विमानतळावरून जयपूरकडे रवाना झाले. मात्र एक वृद्ध प्रवासी आजारी पडल्याने विमान जयपूरकडे वळवण्यात आले. विमान जयपूर विमानतळावर उतरताच आजारी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानात एकूण किती प्रवासी होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

























































