लग्नातील बिर्याणीत लेग पीस मिळाला नाही, भर मंडपातच वऱ्हाडी भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाच्या जेवणात बिर्याणीत लेग पीस मिळाले नाही म्हणून भर मंडपात दोन्ही बाजूचे वऱ्हाडी भिडल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वाद टोकाला गेला आणि लग्नमंडपाचे रणभूमीत रुपांतर झाले. दोन्ही बाजूच्या वऱ्हाड्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या, हॉटेलची तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. एका खासगी बँक्वेट हॉलमध्ये लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. जेवणादरम्यान काही पाहुण्यांनी बिर्याणीमध्ये लेग पीस नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यामुळे त्यांच्यात वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा वाद इतका वाढला की वऱ्हाड्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आणि बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. अनेक तास हा गदारोळ सुरू राहिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस व्हिडिओच्या मदतीने गुन्हेगाराची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.