
ओडिशाच्या कटक शहरामध्ये दुर्गा पूजेच्या विसर्जनानंतर झालेल्या हिंसाचारानंतर शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 6 ऑक्टोबर रात्री 10 वाजेपासून 7 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त नरसिंह भोला यांनी दिली. शहरात जमावबंदी असली तरी शहरात शाळा, कॉलेज, आवश्यक सेवा, रुग्णालय, किराणा दुकाने आणि पेट्रोल पंप खुले राहणार आहेत. या सर्वांना जमावबंदीतून सूट देण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात 60 पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.