
गंगास्नानासाठी जात असतानाच वाटेतच रिक्षा आणि हायवाची जोरदार धडक झाली. या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाटणा शहर उपविभागातील शाहजहांपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिगरियामाजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली. गंगास्नानासाठी 13 जण रिक्षाने फतुआ येथे चालले होते. मात्र वाटेतच रिक्षा आणि हायवाची धडक झाली. यात सात महिलांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.