जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, सीआरपीएफ जवानासह चौघांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका सीआरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला. प्रवासी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा मोबाईल वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली.

समोरून येणाऱ्या बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला धडकली. या अपघातात टाटा मोबाईल वाहनाचे टायर बदलणाऱ्या तीन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाचाही मृत्यू झाला.