भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक

भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक देत 10 ते 15 जणांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एअरपोर्ट रोडवर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. अतिवेगामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक देत 10 ते 15 नागरिकांना चिरडले. अपघातादरम्यान ट्रकमध्ये एक बाईक अडकली होती. ट्रकने या बाईकला फरफटत दूरपर्यंत नेल्याने बाईकला आग लागली. यामुळे ट्रकलाही आग लागली.

अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.