
झारखंडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून हत्यारे जप्त करण्यात आली आहे. बिशुनपूर येथील जंगलात गुमला पोलीस आणि जेजेएमपी नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. परिसरात शोध मोहिम सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घाघरा-बिशुनपूर क्षेत्रातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांची शोध मोहिम सुरू केली. यावेळी जेजेएमपी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जेजेएमपी नक्षलवादी संघटनेचा झोनल कमांडर आणि दोन एरिया कमांडर ठार झाले. लालू लोहरा बरसटोली, छोटू उरांव हुसीर लातेहार आणि सुजीत उरांव रोरेड अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून तीन एके-47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.