संघात न घेतल्याने संताप अनावर, तीन खेळाडूंकडून क्रिकेट प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला

क्रिकेट स्पर्धेसाठी संघात न घेतल्याच्या रागातून तीन खेळाडूंनी प्रशिक्षकाला बॅटने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन खेळाडूंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. वेंकटरमन असे हल्ला करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. तर कार्तिकेयन जयसुंदरम, अरविंदराज आणि एस. संतोष कुमारन अशी आरोपी खेळाडूंची नावे आहेत.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघात निवड न केल्याचा राग मनात धरून कार्तिकेयन जयसुंदरम, अरविंदराज आणि एस. संतोष कुमारन यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ पुडुचेरी (CAP)चे प्रशिक्षक एस. वेंकटरमन यांना बॅटने जीवघेणी मारहाण केली. या मारहाणीत वेंकटरमन डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. डोक्याला 20 टाके घालण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.