
दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार आत घुसल्याने एकच खळबळ उडाली. प्रवेशद्वारावरील बॅरिकेट्स उडवून कारने आत प्रवेश केला. कारमधील व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या खोलीबाहेर पुष्पगुच्छ ठेवून घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे दिल्ली विधानसभेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यूपीचा नोंदणी क्रमांक असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सिएरा कारने मॉल रोडवरील गेट क्रमांक 2 व्हीआयपी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. कारमधील व्यक्तीने मास्क घातला होता. तो थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाजवळ गेला. त्याने तेथील पोर्चजवळ फुलांचा गुच्छ ठेवून तिथून पळ काढला. या घटनेमुळे सचिवालय आणि विधानसभा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही कार आत कशी घुसली याचा तपास सुरू आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विधानसभा परिसरात दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा शोध सुरू आहे.
VIDEO | Delhi: Outside visuals from the Delhi Assembly premises after a car attempts to forcibly enter the complex, breaching security barriers.
A car driven by a masked man forced through one of the boundary gates of the Delhi Assembly premises, leading to a security scare on… pic.twitter.com/WXXcVBWkQI
— Press Trust of India (@PTI_News) April 6, 2026



























































