राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्राला उपविजेतेपद

362

महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने राष्ट्रीय शालेय 17 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ऐतिहासिक उपविजेतेपद संपादन केले. दिव-दमण येथे नुकत्याच झालेल्या 65 व्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने हा पराक्रम केला. अंतिम लढतीत उत्तर प्रदेशविरुद्ध हार पत्करावी लागल्याने महाराष्ट्राचे जेतेपदाचे स्वप्न भंगले. किताबी लढतीत नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राला निर्धारित 30 षटकांत 8 बाद 126 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.

सरिश देसाईने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली, तर तिलक जाधव (23) व ऋषिकेश दौंड (21) हेच इतर धावांची विशी आलांडणारे फलंदाज ठरले. याचबरोबर 14 अवांतर धावांचा खुराक मिळाला म्हणून महाराष्ट्राला सवाशे धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरादाखल उत्तर प्रदेशने 28.5 षटकांत 7 फलंदाजांच्या मोबदल्यात 130 धावा करून पूर्ण केले. माफक धावसंख्येचा बचाव करताना महाराष्ट्रानेही 16 अवांतर धावा बहाल केल्याने त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली, मात्र स्पर्धेच्या इतिहास महाराष्ट्राचा 17 वर्षांखालील संघ प्रथमच अंतिम फेरीत गेल्याने या उपविजेतेपदालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या