निवडणूक आयोग एकांगी भूमिका घेतेय, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व पक्ष चिन्ह याबाबत गुरुवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही गट निवडणूक आयोगासमोर काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकीलांनी निवडणूक आयोगासमोर त्यांची भूमिका मांडली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकीलांनी निवडणूक आयोग हा एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही असे आयोगाला कळवलेले असतानाही निवडणूक आयोग फूट पडल्याचे गृहित धरत सुनावणी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असताना पक्षामध्ये फूट पडली असं कसं म्हणता येईल, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.