नौशीनचे पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘बरसातें – मौसम प्यार का’ मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. सध्या मालिकेत प्रेक्षकांना आराधनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मयांकचा प्रवेश होताना दिसणार आहे. तो आराधना आणि रेयांश यांच्या आयुष्यात आणखीच गुंतागुंत निर्माण करणार आहे. मालिकेत आता नौशीन अली सरदार हिची एंट्री झाली आहे. ती मालिनी खन्नाची भूमिका साकारत आहे. तिला मिमी या नावानेही ओळखले जाते. मालिनी ही एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी महिला आहे. ती एका मीडिया कंपनीची मालक असून देहरादूनमध्ये तिच्या तीन मुलांचाही सांभाळ करत असते.

‘बरसातें- मौसम प्यार का’ मालिकेच्या माध्यमातून जवळपास पाच वर्षांनंतर टेलिव्हिजनर नौशीन अली सरकारने पुनरागमन केले आहे. याविषयी नौशीन म्हणाली, ‘हे माझ्यासाठी घरी परतल्यासारखे आहे. जेव्हा या मालिकेचे कथानक मला ऐकवण्यात आले होते. मी लगेच मिमीकडे आकर्षित झाले. मालिनी खन्नाची व्यक्तिरेखा जिवंत करून दाखवणे, हे माझ्यासाठी परिपूर्ण पुनरागमन आहे. या भूमिकेच्या माध्यमातून मला भाव-भावनांच्या विविध छटा दाखवण्याची संधी मिळणार आहे.