केरळच्या कोच्चीमध्ये नौदलाचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या कोच्चीमध्ये रविवारी सकाळी थोप्पुम्पदी पूलाजवळ नौदलाचे ग्लायडर कोसळले. या दुर्घटनेत नौदलातील दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नियमित प्रशिक्षणादरम्यान ग्लायडर कोसळल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. आयएनएस गरूडहून ग्लायडरने उड्डाण केले होते. थोप्पुमपाडी पुलाजवळ आल्यावर ग्लायर कोसळले. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. लेफ्टनंट राजीव झा (वय 39)आणि पेटी अधिकारी (इलेट्रिकल एअर) सुनीलकुमार पोएला (29) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. या ग्लायडरने लेफ्टनंट राजीव झा आणि सुनीलकुमार पोएला उड्डाण करत होते. ग्लायडर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना आयएनएचएस संजीवनी येथे हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नौदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.