नवी मुंबई मेट्रो खासगी क्षेत्राऐवजी सरकारी कंपनीकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
657 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांच्या मार्गाचे काम सुरू आहे. 300 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे

एमएमएमओसीएलकडे जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली

नवी मुंबई मेट्रो चालवण्यास आणि देखभाल करण्यास मागवण्यात आलेल्या निविदांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे काम आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रो महामंडळ (एमएमएमओसीएल) करणार आहे.

बेलापूर ते पेंढारपर्यंत नवी मुंबई मेट्रो धावते. त्या मार्गावर 11 स्थानके आहेत. 12 सप्टेंबरपासून ती मेट्रो ट्रकवर आली. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) त्यावर 3064 कोटी रुपये खर्च केला. ही मेट्रो चालवण्यासाठी आणि देखभालीसाठी सिडकोने निविदा काढल्या. त्यांना अनेकदा मुदतवाढही दिली गेली, परंतु त्यात कोणीही रस दाखवला नाही. त्यामुळे एमएमएमओसीएलकडेच ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले, परंतु त्या प्रक्रियेला दोन-तीन महिने लागतील असेही त्यांनी सांगितले.

एमएमएमओसीएलकडे जबाबदारी देण्यापूर्वी या मेट्रोतून मिळणाऱया महसुलाचे एमएमएमओसीएल आणि सिडकोमध्ये कसे वाटप करायचे यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.