नवी मुंबईत निवडणूक आयोगाचा कारनामा, मतपत्रिका फायनल झाल्यानंतर शिवसेना उमेदवाराचे नाव बदलले

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनले आहे याचा आणखी एक कारनामा नवी मुंबईत उघडकीस आला आहे. उमेदवारी अर्जाची छाननी, हरकत घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची अंतिम यादी आणि मतपत्रिका फायनल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराचे नाव बदलले आहे.

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १८ (क) मधून शिवसेनेचे प्रशांत दशरथ खरात हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या प्रभागातून भाजपने दशरथ सीताराम भगत आणि त्यांच्या गोतावळ्याला उमेदवारी दिली आहे. मतपत्रिकेवर कोणते नाव ठेवायचे याचा अधिकार उमेदवारांना दिला आहे. त्यानुसार प्रशांत खरात यांनी मतपत्रिकेवर आपले नाव दशरथ प्रशांत असे टाकण्यात यावे असे कळवले होते. त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख दशरथ प्रशांत असाच मतपत्रिकेवर केला. छाननी आणि हरकत घेण्याची मुदत संपल्यानंतर भाजपचे उमेदवार दशरथ भगत यांनी या नावाला हरकत घेतली. त्यानंतर प्रितीलता कौरथी यांनी मनमानी पद्धतीने दशरथ प्रशांत यांच्या नावात बदल करून प्रशांत दशरथ खरात असे नाव मतपत्रिकेवर टाकले.