सिद्धू यांचा काँग्रेसला रामराम, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत

2099

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले व त्यानंतर काँग्रेसमधील नेत्यांशी वाद घालणारे नवज्योत सिंह सिद्ध हे गेल्या काही दिवसांपासून अजिबात प्रसारमाध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे सिद्धू हे राजकारणातून निवृत्त होणार अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच आता नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तसेच त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे देखील संकेत दिले आहेत.

नवज्योत कौर सिद्धू यांच्या पत्नी यांचे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट कापण्यात आले होते. नवज्योत कौर यांच्या जागी भटिंडा येथून माजी रेल्वे मंत्री पवन बन्सल यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर नवज्योत कौर या राजकारणापासून लांब झाल्या होत्या. अखेर बुधवारी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. ‘मी काँग्रेसचा राजीनाम दिला असून सध्या मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तसेच आता मी फक्त सामाजिक कार्य करणार’, असे नवज्योत कौर यांनी सांगितले.

दरम्यान पत्रकारांनी त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू हे देखील निवृत्ती घेणार आहेत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. मात्र सध्या सिद्धू हे काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सिद्धू हे शांत असून त्यांनी मीडियासोबतही संवाद साधला नाही. तसेच ते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमातही भाग घेताना दिसलेले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या