नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 30 ऑक्टोबरला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरला सुनावणी निश्चित केली आहे. गुरुवारी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठापुढे मलिक यांच्या वकिलांनी नियमित जामीन अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जाची न्यायमूर्तींनी गंभीर दखल घेतली आणि 30 ऑक्टोबरला सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.

किडनी विकारासह विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या मलिक यांना गेल्या महिन्यात वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र त्याचवेळी नियमित जामीन अर्जावर गुणवत्तेच्या आधारे सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मलिक यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यापुढे नियमित जामीन अर्ज दाखल करून सुनावणी निश्चित करण्याची विनंती केली. यावेळी मलिक आणि अंमलबजावणी संचालनालया (ईडी)चे प्राथमिक म्हणणे ऐकून घेत न्यायमूर्ती डिगे यांनी मलिक यांच्या नियमित जामीन अर्जावर 30 ऑक्टोबरला सुनावणी निश्चित केली.