अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीची कोरोना चाचणी, चार दिवस राहणार होम क्वारंटाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी याची कोरोना चाचणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. मुंबईहून तो मुजफ्फरनगर इथल्या त्याच्या मूळ घरात परतल्यानंतर ही चाचणी करण्यात आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या लॉकडाऊनमुळे देशभरात चित्रीकरण बंद आहेत. त्यामुळे फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचं काम ठप्प आहे. कॅमेऱ्याच्या समोरचे आणि मागचे असे सगळेच घरी बसले आहेत. त्यामुळे अनेक तंत्रज्ञ आणि कलाकारांनी आपल्या मूळ घरी जाणं पसंत केलं आहे. त्याप्रमाणेच नवाजुद्दिन यानेही आपल्या मूळ घरी परतायचा निर्णय घेतला होता.

नवाजुद्दिन सिद्दिकीचं मूळ घर उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील बुढाना इथे आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नवाजुद्दिनने परवानगी घेऊन आपलं मूळ घर गाठलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं होतं. तिथे पोहोचल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने त्याची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून तो पुढील चार दिवस होम क्वारंटाईन राहणार आहे.

नवाजुद्दिन लवकरच घुमकेतू नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. 22 मे रोजी झी5 वर रिलीज होणार असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दिन एका छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हे पोलिसाच्या भुमिकेत आहेत. या चित्रपटात नवाजुद्दिन मुख्य भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, चित्रांगदा सिंह, लॉरेन गोटलिब आणि दिग्दर्शक निखिल आडवानी पाहुण्या भुमिकेत दिसणार आहेत.