
सामना ऑनलाईन, मुंबई
भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांना देशात दंगलच माजवायची होती. या माओवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी कृत्ये करणारी संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’सोबत थेट संबंध आहेत आणि आरोपी गौतम नवलखा याचीही यात महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप राज्य सरकारने आज हायकोर्टात केला.
भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांना देशात दंगलच माजवायची होती. या माओवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी कृत्ये करणारी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनसोबत थेट संबंध आहेत आणि आरोपी गौतम नवलखा यांचीही यात महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप राज्य सरकारने बुधवारी प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टात केला.
भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून गौतम नवलखा यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी ऍड. युग चौधरी यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सरकारच्या वतीने ऍड. अरुणा पै यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, नवलखा यांच्या विरोधात सरकारकडे सबळ पुरावे आहेत. हिजबुलकडून शस्त्रs, स्फोटके व दहशतवादी कारवायांसाठी नक्षलींना तसेच माओवाद्यांना मदत केली जाते. यासंबंधीचे पुरावे अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंगच्या लॅपटॉपमधून मिळाले आहेत अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. याशिवाय शहरी नक्षलवादप्रकरणी अटकेत असलेल्या इतर आरोपींनाही शहरी आणि ग्रामीण नक्षलवादाशी संबंधित जबाबदारी ठरवून दिलेली होती. अशी माहितीही ऍड. पै यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.
नवलखा नक्षलवाद्यांच्या बाजूने
नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करू नये यासाठी हायकोर्टात जोरदार युक्तिवाद करणाऱया राज्य सरकारने नवलखा यांच्या विरोधातील सबळ पुरावे खंडपीठासमोर मांडले. याशिवाय नक्षलवादी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करून सरकारची मदत केल्याचा दावा करणाऱया नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोप राज्य सरकारच्या वतीने खंडपीठासमोर केला.


























































