कोब्रा कमांडोच्या ताफ्यावर नक्षलवादी हल्ला, 15 जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
naxal-attack
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । रांची

झारखंडमधील सराईकेला या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी मंगळवारी पहाटे सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करत भुसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान जखमी झाले आहेत. या सर्व जवानांना विशेष विमानाने रांची येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कोब्रा दलाचे जवान व झारखंड पोलीस विशेष कारवाईसाठी जात होते. त्यावेळी सराईकेलामधील कुचाईभागाच जमिनीखाली गाडून ठेवलेल्या भुसुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात 11 जवान जखमी झाले.

1 मे रोजी महाराष्ट्रातील गडचिरोलीतीला कुरखेडा भागात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या महाभयंकर भुसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते.