
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या पुतण्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) गोवा युनिटने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. नुकतेच ‘एनसीबी’ने मीरा रोड येथे कारवाई करून सुफरन लकडावालाला अटक केली होती. सुफरनच्या चौकशीत अबू अस्लमचे नाव समोर आले.
नुकतीच ‘एनसीबी’ मुंबई युनिटने मीरा रोड येथे कारवाई करून सुफरनला अटक केली होती. सुफरन ड्रग्ज तस्करीसाठी हिंदुस्थानातील विविध ठिकाणी जात असायचा. तो मुंबई आणि दिल्ली येथील पेडलरकडून ड्रग्ज घेऊन त्यानंतर त्याची तो विक्री करत असायचा. ड्रग्जप्रकरणी ‘एनसीबी’ने सुफरनची चौकशी केली. त्याच्या चौकशीत अबू अस्लमचे नाव समोर आले. ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’ गोवा युनिटने अबू अस्लमला समन्स पाठवले आहे.

























































