
सामना ऑनलाईन, चंद्रपूर
चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याची पोलखोल केली याचा राग आल्याने आयोजकांनी भास्कर कावळे नावाच्या तरुणाला मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याऐवजी भास्कर कावळेला पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आसूड आंदोलन केलं. नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं.
व्हिडीओ-भाजपच्या रोजगार मेळाव्याची पोलखोल केल्याने तरुणाला मारहाण?
मुंबईमध्ये व्हॉटसअप पोस्टवरून झालेल्या वादातून काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजप कार्यकर्त्यांनी खून केला होता. गुंडांना राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळत असून राज्यासाठी चिंतेची बाब असल्याचं आंदोलकांनी म्हटले आहे. ज्या युवकाला मारहाण करण्यात आली त्याला न्याय मिळावा आणि मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
































































