
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर मिश्किल टिप्पणी केली. यावेळी शरद पवार यांनी तेवढं बेळगाव देऊन टाका व प्रश्न संपवा, असे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
पुण्यातील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला शरद पवारांनी हजेरी लावली होती. या रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे हे बेळगाव येथे वास्तव्याला आहेत. यावेळी डॉ. कोरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. ”शरद पवार कायम बेळगाव कधी देणार, अशी विचारणा करत असतात. त्यावर मी त्यांनी म्हटले की, बेळगावच कशाला संपूर्ण कर्नाटकच घेऊन टाका, असे डॉ. कोरे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना ”शरद पवार यांनी तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा” अशी टिपण्णी केली. त्यांच्या या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.


































































