राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी कोरोना पॉझिटिव्ह, लग्न सोहळ्याला राहिले होते उपस्थित

837

जगभरात थैमान घातलेला कोव्हीड-19 हा संसर्गजन्य आजार आता परभणी जिल्ह्यात चांगलेच पाय पसरत आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परीषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना अस्वस्थ वाटत असल्याने संभाजीनगर येथे नेले. तपासणीनंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: आमदार दुर्राणी यांनी दिली.

दुर्राणी हे दोन ते तीन दिवसापूर्वी एका लग्न सोहळ्यासाठी नांदेडला गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परत आल्यावर त्यांना लक्षणे दिसू लागल्याने शेतातील फार्महाऊसवर ते क्वारंटाईन झाले होते. शुक्रवारी रात्री सर्दी-ताप जास्त वाटत असल्याने ते उपचारासाठी संभाजीनगरला रवाना झाले. या ठिकाणी कोव्हीड-19 चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.

आपली प्रतिक्रिया द्या