राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधवही शिवसेनेत प्रवेश करणार

1528

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोमवारी श्रीवर्धनमधील राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने कोकणातील राष्ट्रवादीचा गड ढासळला आहे.

भासकार जाधव येत्या 13 सप्टेंबरला आपण मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहोत अशी घोषणा खुद्द भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केली. आपल्यासोबत गुहागर मतदारसंघातील पंचायत सदस्य व 73 सरपंचही शिवसेनेत प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या