राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप गंगाधर सोपल यांनी राजीनामा दिला. आज मंगळवारी संभाजीनगर तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सादर करण्यात आला असून त्यांनी तो मंजूर केला आहे. यावेळी शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे आदी उपस्थित होते.