राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने संग्राम जगताप या अपघातातून बचावले असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संग्राम जगताप यांची बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बस यांच्यात अपघात झाला आहे. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात जगताप यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत.