
निवडणुका आल्या की जाती धर्माचं राजकारण करून राजकीय पोळी भाजायची आणि पैशाचा विषय आला की सरसकट दलाली खायची. हाच भाजपचा खरा चेहरा आणि Modus operandi आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच भाजपच्या याच राक्षसी वृत्ती आणि प्रवृत्ती पासून प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे असेही रोहित पवार म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून म्हटले की, राजकीय वरदहस्त असलेल्या लुटारू टोळींने जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु या जागेबाबत आरोपांची राळ उठताच आणि जैन समाज व सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागली. आता जैन बोर्डिंगची जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं समजतंय.
इतके दिवस सरकार एकच सांगत होतं की, यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. मग गैरव्यवहार झाला म्हणून जागा पुन्हा ट्रस्टकडं सुपूर्द केली जात असेल तर सरकारच्या जवळच्याच कुणालातरी यामधे मोठ्या प्रमाणात नफेखोरी करायची होती हे स्पष्ट होतय. निवडणुका आल्या की जाती धर्माचं राजकारण करून राजकीय पोळी भाजायची आणि पैशाचा विषय आला की सरसकट दलाली खायची. हाच भाजपचा खरा चेहरा आणि Modus operandi आहे. या प्रकरणात देखील त्यांना हेच करायचं होतं मात्र लोकांनीच यांचा बुरखा फाडल्यामुळे माघार घ्यावी लागली. भाजपच्या याच राक्षसी वृत्ती आणि प्रवृत्ती पासून प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे. असो! अखेर जैन बोर्डिंगसाठी ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला, संघर्ष केला, त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन! असेही रोहित पवार म्हणाले.
राजकीय वरदहस्त असलेल्या लुटारू टोळींने जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु या जागेबाबत आरोपांची राळ उठताच आणि जैन समाज व सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागली. आता जैन बोर्डिंगची जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 29, 2025




























































