
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पुर आला असून मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चार राज्यात बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 83 टीम रवाना झाल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पाडली. या बैठकीत आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
एनडीआरएफच्या 83 टीम सर्व साधनांसह चारही राज्यातील पूरग्रस्त भागात पोहोचली आहे. या 83 टीम सैन्य, नौदल आणि वायुदलाच्या 173 टीमसोबत बचावकार्य करत आहेत. एनडीआरपीएफच्या एका टीममध्ये 45 कर्मचारी असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सर्व परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत. बचावकार्यासाठी सर्वतोपरी करण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत.
हिंदुस्थान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे.

























































