
आसाममध्ये दोन पेक्षा अधिक मुले असल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही असा कायदा राज्य सरकार आणणार आहे. या बातमीचे वार्तांकन करताना एनडीवीटीव्हीच्या वृत्तनिवेदिकेने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना सहा मुले आहे असा दावा केला. परंतु सोनोवाल हे अविवाहित आहे. ही चूक जेव्हा चॅनेलच्या समोर आली तेव्हा एनडीटीव्हीने जाहीर माफी मागितली आहे.
We are extremely regretful that a NDTV anchor inadvertently said on air that the Chief minister of Assam, @sarbanandsonwal, had six children, when it is a known fact that he is unmarried. (1/3) pic.twitter.com/2jl4K8OmKC
— NDTV (@ndtv) October 26, 2019
एनडीटीव्हीच्या निवेदिका सोनल मेहरोत्रा कपूर या निवेदन करत होत्या. जर दोन पेक्षा अधिक मुले असल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही असा कायदा आसाम सरकार आणणार आहे. परंतु मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना सहा मुले आहेत असे सोनल मेहरोत्रा कपूर म्हणाल्या. परंतु ही माहिती चुकीची आहे. अनावधानाने ही चूक झाली अशी कबुली एनडीटीव्हीने दिली आहे.




























































