नीट-पीजी काऊन्सिलिंग 12 जानेवारीपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी आज दिली. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी 27 टक्के ओबीसी आणि 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेले आरक्षण कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. त्यानंतर आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नीट-पीजीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली.