
हिंदुस्थानी सुपरस्टार अॅथलीट नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत डायमंड लीग ट्रॉफी (Diamond League) जिंकली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने 88.44 मीटर अंतरावरून भाला फेकून ट्रॉफी जिंकली. डायमंड लीगची ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकणारा तो देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 2017 आणि 2018 मध्ये नीरज फायनलसाठी पात्र ठरला होता, पण त्यानंतर तो टॉप 5 मधून बाहेर पडला होता. पण यंदा मात्र नीरजने इतिहास रचला.
Golds,Silvers done, he gifts a 24-carat Diamond this time to the nation
Ladies & Gentlemen, salute the great #NeerajChopra for winning #DiamondLeague finals at #ZurichDL with 88.44m throw.
FIRST INDIAN AGAIN#indianathletics
X-*88.44*-86.11-87.00-6T pic.twitter.com/k96w2H3An3
— Athletics Federation of India (@afiindia) September 8, 2022
डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात खराब झाली होती. त्याने अंतिम फेरीची सुरुवात फाऊलने केली, त्यामुळे तो यादीत खालच्या स्थानावर होता. मात्र, पुढच्याच प्रयत्नात नीरजने 88.44 मीटर भाला फेकून पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर नीजरने तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेक केली.
नीरजच्या पाठोपाठ चेक रिपब्लिकच्या जेकब वडलेचने 86.94 मीटर थ्रोसह तिसरा क्रमांक पटकावला तर जर्मनीचा ज्युलियन वेबरने 83.73 मीटर भाला फेकून तिसरा क्रमांक पटकावला.






























































