
बॉलिवूडमध्ये सध्या गोड बातम्यांचा मोसम आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री करीना कपूर खान हिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही आपल्याला मुलगा झाल्याची बातमी शेअर केली. आता अजून एक सेलिब्रिटी जोडीने दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार असल्याचं जाहीर केलं आहे.
हेही वाचा – Photo – लग्नाआधीच गरोदर राहिल्या ‘या’ अभिनेत्री, नावं वाचून व्हाल अवाक
ही जोडी म्हणजे अभिनेता अंगद बेदी आणि त्याची पत्नी अभिनेत्री नेहा धुपिया. नेहा आणि अंगदने ट्विटरच्या माध्यमातून आपण दुसऱ्यांदा आई बाबा होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Took us 2 days to come with a caption….The best one we could think of was … Thank you, God. ❤️ @Imangadbedi @BediMehr #WaheguruMehrKare pic.twitter.com/j64Q0oCwIy
— Neha Dhupia (@NehaDhupia) July 19, 2021
नेहा आणि अंगद यांनी आपली मुलगी मेहेर हिच्यासोबत एक फोटो शूट केलं आहे. त्या फोटोशूटमधील फोटो त्या दोघांनीही शेअर केले आहेत.
Took us 2 days to come with a caption….The best one we could think of was … Thank you, God. ❤️ @Imangadbedi @BediMehr #WaheguruMehrKare pic.twitter.com/j64Q0oCwIy
— Neha Dhupia (@NehaDhupia) July 19, 2021
नेहा धुपिया हिच्या पहिल्या गरोदरपणावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कारण, लग्नापूर्वीच ती गर्भवती झाली होती. तसा खुलासाच तिने आणि अंगदने एका मुलाखतीत केला होता. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं गेलं होतं.



























































