नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरात परतणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाली तेव्हा अनेकांना त्याचा धक्का बसला होता. नेहा बिग बॉसच्या विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक होती त्यामुळे तिच्या अशा अचानक झालेल्या एलिमिनेशने तिचे चाहते नाराज झाले होते. नेहाच्या चाहत्यांनी गेल्या दोन आठवड्यात सोशल मीडियावर नेहाला बिग बॉसच्या घरात परत पाठविण्यासाठी जोरदार मोहीम राबविली होती.  या मोहिमेमुळे नेहाला बिग बॉसच्या घरात परत घेण्याचा निर्णय झाला आहे.

बिग बॉस फेक? अमृता फडणवीसांसोबत दिसले अनूप जलोटा

अनुप जलोटा बिग बॉसचे महागडे स्पर्धक

नेहा पेंडसेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास फक्त तीन आठवड्यांचा होता. त्यात एकदा ती घराची कॅप्टनही झाली. मात्र बिग बॉसने काळ कोठडीसाठी जेव्हा नावे मागवली तेव्हा करणवीर, श्रीसंथ आणि नेहाने कोणाचेही नाव सुचविण्यास नकार दिला. त्यांची ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली व त्यांना त्या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आले. श्रीसंथला आठवड्याच्या मध्येच घरातून बाहेर काढत बिग बॉसने त्याला सिक्रेट रुममध्ये ठेवले होते. त्यानंतर करणवीर आणि नेहामध्ये नेहाला सर्वात कमी मतं मिळाल्याने तिला घरातून बाहेर व्हावे लागले होते. नेहाला परत घरात घेण्यासाठी #BringNehaPendseBack हा हॅशटॅग सुरू करण्यात आला होता. या हॅशटॅगमुळे नेहाला परत घरात घेण्यात येणार असून आजच्या किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये परत दिसायला लागेल.

summary : Nehha Pendse to re-enter the Bigg Boss 12 house