मुंबईत 2 लोकलचा अपघात टळला? वाचा काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची ‘लाईफलाईन’ समजली जाणारी लोकल आणि गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असते. दररोज या लोकलमधून लाखो लोक प्रवास करत असतात. त्यात ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाला की प्रवाशांचे हाल होतात. गुरुवारी हार्बर मार्गावरच्या एका घटनेमुळे तर प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. नेरुळ ते सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान दोन लोकल समोरासमोर आल्याची बातमी आली आणि प्रवाशांच्या जीवाला घोर घालला. दोन लोकल समोरासमोर पाहून चर्चांना उधाण आले… ‘लोकलचा अपघात टळला’ अशीसुद्धा चर्चा रंगली.

हार्बर मार्गावरून एक लोकल पनवेलवरून सीएसएमटीकडे जात होती तर दुसरी ट्रेन सीएसएमटीहून पनवेलकडे जात होती. नेरुळ आणि सीबीडी बेलापूर दरम्यान रेल्वे क्रॉसिंगदरम्यान या गाड्या समोरासमोर आल्या त्यामुळे मोठा अपघात टळल्याची चर्चा रंगली. ऐन गर्दीच्या वेळी घरी जाण्याच्या वेळी प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु काही वेळातच सत्य समोर आले.

local-harbour

रेल्वे विभागाने दोन लोकल ट्रेन्स एकमेकांसमोर आल्याचे वृत्त फेटाळले आहे. बेलापूर ते खारघर दरम्यान डाऊन ट्रॅकदरम्यान रुळाला तडा गेला होता. या मार्गावर 4.30 ते 5 दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे साहजिकच रेल्वेच्या रांगा लागल्या. त्यामुळे लोकांना पाहताना दोन विरुद्ध दिशेच्या लोकल समोरासमोर आल्यासारखे वाटले, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.

local-track