‘नेट’ परीक्षेत साठ हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण

727

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) डिसेंबर 2019 मध्ये घेतलेल्या यूजीसी-नेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात साठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 60147 विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तर 5092 विद्यार्थी ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत.

गेल्या 2 डिसेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान देशातील 700 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 10 लाख 34 हजार विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती पण प्रत्यक्षात 7 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी ही ऑनलाइन परीक्षा दिली होती. या परीक्षेत पारदर्शकता यावी म्हणून प्रश्नपत्रिका आणि उत्तरे ही खात्री करण्यासाठी विद्यार्थ्यांना दाखवली गेली होती.

आपली प्रतिक्रिया द्या