नेदरलॅण्ड्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात होणाऱया आयसीसी वन डे वर्ल्ड कपसाठी नेदरलॅण्ड्स क्रिकेट संघाची घोषणा झाली. रुलोफ वान डेर मेवरे व कॉलिन एकरमन या अनुभवी जोडीला 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. नेदरलॅण्ड्स संघाची धुरा पुन्हा एकदा स्कॉट एडवर्ड्सच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. कर्णधार एडवर्ड्स व अष्टपैलू रुलोफ वान डेर मेवरे यांच्यावर खऱया अर्थाने नेदरलॅण्ड्सची मदार असेल. या दोघांनाही क्रिकेटविश्वातील अनेक लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. नेदरलॅण्ड्सचा वर्ल्ड कप संघ Š स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डोड, बास डी लिडे, विक्रम सिंह, तेजा निदामानुर, पॉल वान मिकेनेर, कॉलिन एकरमन, रुलोफ वान डेर मेवरे, लोगान वॅन बिक, आर्यन दत्त, रयान क्लेन, वेस्ले बरेसी, साकिब जुल्फिकार, शारिज अहमद, साइब्रॉण्ड एंगेलब्रेक्ट.