जालन्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच; 81 नवे रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये पहिल्या टप्यात 36, दुसऱ्या टप्प्यात 27 आणि अँटीजेनमध्ये 18 अशा एकूण 81 जणांच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 123 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 223 झाली असून बरे झालेल्या रुग्णाची संख्या 2 हजार 897 इतकी आहे. तसेच उपचार सुरु असलेल्यांची संख्या 1 हजार 119 आहे. तर कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना पॉढिटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी शहरामध्ये सर्वाधिक सुखशांतीनगर 3, शिवनगर जूना जालना 2, मोदीखाना2, उर्वरितमध्ये सोनल नगर, आनंदवाडी, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, कसबा गांधीचमन, श्रीकृष्ण रुख्मीनीनगर, सकलेचा नगर, फुकटपूरा, संभाजीनगर व मिल्लतनगर प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर जालना ग्रामीण भागातील नेर 2, दावलवाडी, रामनगर साखर कारखाना, दुधाना काळेगाव व तादुळंवाडी प्रत्येकी 1 रुग्ण, बदनापूर तालुक्यात पाच जण सापडले असून यात शहरात 3 , शेलगाव व सायगाव प्रत्येकी 1 रुग्ण, अंबडमध्ये तालुक्यात 9 जणांचा समावेश असून यात म्हाडा कॉलनी 3, श्रीकृष्ण मंदिर जवळ 2, नुतन वसाहत 1, माळी गल्ली 1, शेवगा 1 व रुई 1 रुग्ण, घनसावंगी शहरात 1, परतुर तालुक्यातील आष्टीत 1, मंठा तालुक्यात आठ रुग्ण सापडले असून यात शहरात 7, विढोळी 1, जाफराबादमध्ये 8 जणांचा समावेश आहे. त्यात शहरात 4, चिंचखेडा, खासगाव, देऊळगाव उगले तर अकोलादेव प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. भोकरदन शहरातील देशमुख गल्लीत 1, शेलुद 3, आधुंड 1, चिंचोली बु 1, सिंदखेडराजा 1 रुग्ण, सेलू 1, सिरसदेदवी गेवराई 1 रुग्ण सापडला आहे. अशा एकूण 81 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.