जन्मानंतर काही मिनिटांतच बालकाला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे दीड लाख लोकोंना लागण झाली असून पाच हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लागण झालेल्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून यात आता एक नवजात बालकाचा देखील समावेश झाला आहे. लंडनमध्ये एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाच्या जन्माच्या काही मिनिटानंतरच त्याला कोरोनाची लागण झाली.

लंडमधील मिडलसेक्स येथे राहणारी एक महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. आपल्याला न्यूमोनिया झाला या भीतीने ती मिडलसेक्स युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल झाली. मात्र तिथे गेल्यावर तिला समजले की तिला कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसूती केली असता तिच्या बाळाला देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या दोघांनाही वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.